Abhay Yojana Maharashtra 2023
Abhay Yojana Maharashtra
नमस्कार मित्रांनो ,आज आपण पाहणार आहोत कि अभय योजना 2023, या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.चला तर मग मित्रांनो पाहुयात ,काय आहे अभय योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील, सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
अभय योजना काय आहे ?
श्री विलासराव देशमुख अभय योजना 2023 बद्दल
योजनेअंतर्गत, सरकार ग्राहकांना एकाच वेळी मूळ रक्कम जमा केल्यावर 100% व्याज आणि विलंब शुल्क माफी देणार आहे . ज्या ग्राहकांकडे हाय टेन्शन कनेक्शन आहेत त्यांना अतिरिक्त 5% सूट मिळेल.
या योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील जे थकीत अर्जदार ३० एप्रिल २०२३पर्यंत संपूर्ण रकमेचा भरणा करतील, अशा अर्जदारांचे १०० टक्के विलंब शुल्क माफ करण्यात येईल व अल्प उत्पन्न गटातील जे अर्जदार या तारखेपर्यंत संपूर्ण रकमेचा भरणा करतील, अशा अर्जदारांचे एकूण विलंबशुल्काच्या २५ टक्के एवढे विलंब शुल्क माफ करण्यात येईल.
या योजनेचा लाभ कसा घेता येईल ?
अभय योजना 2023
- महाराष्ट्र राज्य शासनाने वस्तू व सेवा कर विभागा अंतर्गत नवीन योजना जाहीर केली आहे.
- व्हॅट, बीएसटी, सीएसटी अशा कायद्यानंतर्गत असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्याची ही सुवर्णसंधी आहे.
- 30 जून 2017 पर्यंतच्या कालावधीच्या थकबाकी करिता अभय योजना ही लागू होणार आहे.
- वैधानिक आदर्श नुसार रुपये दोन लाख किंवा कमी असलेली थकबाकी निलंबित करण्यात येईल.
- रुपये दोन लाख पेक्षा जास्त थकबाकीसाठी विवादित करात 50 ते 70 टक्के तसेच व्याजात 85 ते 90% व शास्तीच्या 95 टक्के सवलत मिळणार आहे.
- रुपये 50 लाखापर्यंत थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांना एकत्रित 20 टक्के रक्कम भरून थकबाकीतून मुक्त होण्याचा पर्याय आहे.
- तसेच रुपये 50 लाखांपेक्षा जास्त थक बाकीदारांसाठी हप्ते समितीचा पर्याय उपलब्ध आहे.
अभय योजना
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ग्राहक त्यांचेकडील किरकोळ पाणी पुरवठा व ठोक पाणी पुरवठ्याची मूळ पाणीपट्टीची रक्कम पूर्णत: भरतील त्यांना विलंब आकारात सवलत देण्यात येईल.
नोंदणीच्या दिनांकापासून पहिल्या तिमाहीत पूर्ण थकबाकी रक्कमा भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय असलेली विलंब आकाराची संपूर्ण रक्कम 100 टक्के विलंब आकार माफ होईल.
नोंदणीच्या दिनांकापासून दुसऱ्यातिमाही अखेर पूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय विलंब आकार रक्कमेच्या 90 टक्के विलंब आकार माफ होईल व उर्वरित 10 टक्के रक्कम ग्राहकांना भरावयाची आहे.
नोंदणीच्या दिनांकापासून तिसऱ्या तिमाही अखेर पूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय विलंब आकार रक्कमेच्या 80 टक्के विलंब आकार माफ होईल.
व उर्वरित 20 टक्के रक्कम ग्राहकांना भरावयाची आहे.नोंदणीच्या दिनांकापासून चौथ्या तिमाहीअखेर पूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय विलंब आकार रक्कमेच्या 70 टक्के विलंब आकार माफ होईल. व उर्वरित 10 टक्के रक्कम ग्राहकांना भरावयाची आहे.
अभय योजना Application कसे करावे?
अर्जदार केवळ ऑनलाइन पद्धतीने अभय योजना 2023 साठी अर्ज करू शकतात. अर्जदार फॉर्म-I आणि फॉर्म-IA मध्ये ऑफलाइन एक्सेल टेम्प्लेट डाउनलोड करू शकतो, जसे की MAHAGST पोर्टलच्या डाउनलोड सेगमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये प्रदान केले आहे: –
फॉर्म-1:- कोणत्याही वैधानिक आदेशाच्या देय रकमेविरुद्ध आमनेस्टी अर्ज करण्यासाठी.
फॉर्म-1अ:- परताव्याच्या थकबाकीसाठी ऍम्नेस्टी अर्ज करण्यासाठी किंवा फॉर्म- 704 नुसार थकबाकी
योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
- योजनेसाठी अर्ज ऑनलाइन सबमिट करण्यासाठी; अर्जदाराला MAHAGST पोर्टलवर जाणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत
- फॉर्म-I आणि फॉर्म-IA टेम्प्लेटमधील सेटलमेंट (माफी) साठी अर्ज डाउनलोड करणे.
- अर्जाच्या प्रकारानुसार साचा भरणे म्हणजे थकबाकी च्या वर्गानुसार फॉर्म-I किंवा फॉर्म-IA भरणे.
- अर्जाचे प्रमाणीकरण करणे
- ऍम्नेस्टी टेम्प्लेटची .txt फाइल तयार करणे जी वापरकर्त्याने भरलेली असेल आणि प्रमाणित केली आहे.
- लॉग-इन क्रेडेन्शियल्स वापरून MAHAGST पोर्टलवर प्रवेश करा.
- पूर्वी तयार केलेली Form-I/Form-IA .txt फाइल अपलोड करणे.
- अर्जाशी संबंधित कागदपत्रे अपलोड करणे.
- अर्ज सादर करणे.
- कर्जमाफीच्या अर्जाची पोचपावती घेणे.
Mahila kisan yojana Maharashtra 2023 महिला किसान योजना महाराष्ट्र 2023?
पेमेंट करण्याची प्रक्रिया काय आहे?
- MAHAGST website वर जा
- ई-पेमेंटवर तुमचा माऊस पॉइंट ठेवा. टाइल फ्लिप होईल आणि पर्याय payment चा प्रदर्शित होईल.
- तुमचा TIN, Captcha प्रविष्ट करा आणि पुढील बटण दाबा.
- कायदा, फॉर्म आयडी, आर्थिक वर्ष, कालावधी आणि स्थान निवडा. रक्कम प्रविष्ट करा आणि नंतर पेमेंटसाठी पुढे जा दाबा.
- पुढील बटणावर क्लिक करून परतावा धोरणास सहमती द्या आणि नंतर पेमेंट गेटवे निवडाआणि Proceed वर क्लिक करा
- Draft chalan प्रदर्शित केले जाईल.
- मेक पेमेंट वर क्लिक करा
- पेमेंट गेटवे पेज दिसेल त्यामध्ये तुमची जी बँक असेल ती निवडा.
- Proceed for Payment वर क्लिक करा
- गेटवे तुम्हाला बँकेच्या वेबपृष्ठावर पुनर्निर्देशित करेल
- तुमचे नेट बँकिंगचे लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि पेमेंट करा.
- अंतिम transaction पावती तयार केली जाईल. ती डाऊनलोड करून ठेवा.
Conclusion
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही अभय योजना 2023 या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट ,ती योजना म्हणजे काय इत्यादी. आता भय नाही, अभय! अशी टॅग लाईन असलेली ही योजना थकबाकी मुक्ती देणारे आहे. मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !
Abhay Yojana Maharashtra 2023अभय योजना महाराष्ट्र थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ?
Abhay Yojana Maharashtra 2023 अभय योजना महाराष्ट्र थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ?
Abhay Yojana Maharashtra 2023अभय योजना महाराष्ट्र थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ?
Abhay Yojana Maharashtra 2023 अभय योजना महाराष्ट्र थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ?