आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र 2023? Ayushman Bharat Yojana Maharashtra
नमस्कार मित्रांनो , आज आपण पाहणार आहोत कि आयुष्मान भारत योजना. या योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला ह्या मध्ये संपूर्ण माहिती बघायला मिळेल. हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात , कि ह्या मध्ये आपल्याया आता सर्वांना ५ लाख रु. विमा, कार्ड वाटप योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेण्यात येईल , सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येयील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून 5 लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Vihir Anudan Yojana Maharashtra 2023 मागेल त्याला विहीर अनुदान ऑनलाईन अर्ज
आयुष्मान कार्डसाठी कोण पात्र आहे?
असे लोक जे हिरवे, पिवळे आणि गुलाबी शिधापत्रिकाधारक आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड आणि आधार कार्डची छायाप्रत असणे आवश्यक आहे.
आयुष्मान योजनेसाठी पात्रता कशी तपासायची?
आयुष्मान कार्डसाठी पात्रता तपासण्यासाठी, सर्वप्रथम सरकारची वेबसाइट pmjay.gov.in ह्या वेबसाईट तुम्ही बघू शकता.
लाभ व वैशिष्ट्ये
राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे.
विद्यमान महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य या एकात्मिक योजनेत काही बदल करून योजनेचे विस्तारीकरण करून सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
अशाप्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री (Ayushman Bharat Yojana Maharashtra) जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रूपये आहे.
आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रूपये एवढे करण्यात आले आहे.
आयुष्मान कार्ड मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
नागरिकांना त्यांचे आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे किंवा दस्तऐवजांची आवश्यकता असेल, ज्याच्या आधारावर तुम्ही वैद्यकीय उपचारांसाठी कोणत्याही पॅनेल केलेल्या रुग्णालयात प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळवू शकता.
- नागरिकांचे आधार कार्ड
- शिधापत्रिका
- मोबाईल नंबर
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आयुष्मान कार्ड किंवा पात्रता 2023 कोण बनवू शकते
- आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी नागरिकांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे, जे खालीलप्रमाणे आहे.
नागरिक हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना (SECC) वर्ष 2011 मध्ये सूचीबद्ध कुटुंबे
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न स्लिपधारक कुटुंबे
कर्मचारी राज्य विमा योजना (ESIS) आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) कर्मचार्यांचे लाभार्थींना नियमांनुसार ओळखल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जातात.
अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना (SECC) वर्ष 2011 मध्ये सूचीबद्ध कुटुंबे
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न स्लिपधारक कुटुंबे
कर्मचारी राज्य विमा योजना (ESIS) आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) कर्मचार्यांचे लाभार्थींना नियमांनुसार ओळखल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जातात.
दोन्ही योजनांचे कार्ड वाटप लवकरच सुरू होणार
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे.
तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या 1356 एवढी करण्यात आली आहे.
महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची संख्या एक हजार एवढी आहे.
मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण 2.5 लाख एवढी मर्यादा आहे. ती आता 4.5 लाख रूपये एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
FAQ
1. आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. तुम्ही अधिकृत पोर्टलला भेट देऊन योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासू शकता.
2. आयुष्मान कार्ड मिळविण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
भारतीय नागरिक, 18 वर्षांवरील वय, सामाजिक आर्थिक आणि जातिगणना (SECC) वर्ष 2011 मध्ये सूचीबद्ध केलेली कुटुंबे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न स्लिपधारक कुटुंबे व्हा
3. आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
नागरिकांचे आधार कार्ड, रेशनकार्ड, मोबाईल क्रमांक, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो
महात्मा फुले जनआरोग्य योजना
कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यांत 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याव्यतिरिक्त 200 रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या 74 वरून 184 अशी वाढविण्यात आली आहे.
उपचाराच्या खर्च मर्यादेत 30 हजार रुपयांवरून प्रती रुग्ण प्रती अपघात 1 लाख रूपये, अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यामध्ये राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या, राज्यातील व देशातील रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे
Conclusion
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana Maharashtra) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट , ती योजना म्हणजे काय इत्यादी ,मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल .
Ayushman Bharat Yojana 2023
Ayushman Bharat Yojana
Ayushman Bharat Yojana Maharashtra
Ayushman Bharat YojanaAyushman Bharat YojanaAyushman Bharat Yojana