kanda chal anudan yojana
नमस्कार शेतकरी बांधव आज आपण आपल्या लेखात नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत, कि सरकारने नवीन योजना राबवली आहे म्हणजे, कांदा चाळ अनुदान योजना .
या योजने बद्दल आपण पाहणार आहोत कि, नेमकी हि योजना काय आहे व या योजनेत कोण कोण पात्र राहणार आहेत, व यासाठी काय अट असेल, व या योजनेत किती अनुदान मिळणार आहे, हे आपण आपल्या लेखात पाहणार आहोत.
राज्यात खरीप हंगामात काढलेला कांदा लगेच मागणी असल्यास विकला जातो मात्र कमी भाव मिळाल्याने तोच कांदा आपण साठ्वण करून ठेवतो.
स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांना माफक दरात व सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो.
कांदा हे एक जिवंत पीक आहे. त्याचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते.
त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्याला ४५-६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
त्यासाठी ‘कांदाचाळ’ या महत्त्वाच्या माध्यमातून कांदा पिकाची साठवणूक केली जाऊ शकते.
यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले आहे.
उर्वरित रक्कम २ लाख ९८ हजार ३६३ रुपये इतका निधी शेतकऱ्यांना स्वहिस्सा, लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध करावा लागेल.
कांदाचाळीसाठी एकूण प्रकल्प खर्च – ४ लाख ५८ हजार ७३० रुपये येणार आहे.
या बाबीचा लाभ गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येणार आहे.
कांदा साठवण करण्याच्या गोदामाची अर्थात कांदा चाळी ची रुंदी ३.९० मी. लांबी १२.०० मी. एकूण उंची – – २.९५ मी. (जमिनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमाण राहील.
साधारण एक हे. धारण क्षेत्रावर २५ मे. टन कांदा उत्पादन होते.
Vihir Sinchan Anudan Yojana/नवीन सिंचन विहरी साठी आता तब्ब्ल ४ लाख रुपये अनुदान मिळणार.
kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना मिळणार १ लाख ६० हजार रु?
kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना मिळणार १ लाख ६० हजार रु?
kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना मिळणार १ लाख ६० हजार रु?
kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना मिळणार १ लाख ६० हजार रु?