'

Pik Vima Yojana Maharashtra पिक विमा योजना महाराष्ट्र 2023 ?

Pik Vima Yojana Maharashtra

नमस्कार मी २४ तास मराठी या न्युज चॅनेलचा संपादक, आपण आज आपल्या लेखात पाहणार आहोत कि, नक्की पिक विमा योजना काय आहे.

या बद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या लेखात पाहणार आहोत, या योजनेमध्ये काय फायदा शेतकऱ्यांना होणार, हि योजना कशी मिळवायची या बद्दल माहिती आपण पाहुयात.

पिक विमा योजना म्हणजे काय-

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.

योजनेची वैशिष्ट्ये :-

कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

पिक विमा योजना म्हणजे काय-

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा संरक्षण देणे.

पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. योजनेची वैशिष्ट्ये :-

कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

कृषी विमा कसा काम करतो-

राष्ट्रीय कृषी विमा योजना-


NAIS सर्व अन्न पिके (तृणधान्ये आणि कडधान्ये), तेलबिया, बागायती आणि व्यावसायिक पिके यांच्या कव्हरेजची कल्पना करते . या योजनेअंतर्गत कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा सर्व शेतकऱ्यांचा समावेश होतो. अन्न पिकांसाठी विमा रकमेच्या 1.5 टक्के ते 3.5 टक्के प्रीमियम दर बदलतात.

पीक विमा योजनेसाठी 1 रुपयात अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया –

महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र सरकारनं या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.

याशिवाय सर्वसमावेशक पीक विमा योजना काय आहे, या योजनेत तुम्ही सहभागी कसे होऊ शकता, योजनेसाठीचे पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घेऊया.

प्रधानमंत्री पीक विमा योजना

नेमके काय बदल झालेत?

याआधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 %, रबी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5 % एवढा हप्ता भरावा लागायचा.

ही रक्कम, 700, 1000, 2000 पर्यंत प्रतिहेक्टरी जायची. आता शेतकरी 1 रुपया भरुन योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. शेतकरी हप्त्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे.

कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. याशिवाय भाडेतत्त्वार शेती करणारे शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

खरिप हंगामातील भात (धान), खरिप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भूईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरिप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.

तर रबी हंगामातील गहू, रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग, रबी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.

तुम्ही स्वत: पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता.

आता स्वत: ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आता पाहूया.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

पीक विमा योजनेत तुम्ही स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी सगळ्यात आधी pmfby.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट ओपन होईल.

इथल्या Farmer Application या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर Guest Farmer या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आता नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करायची आहे.

इथं सुरुवातीला शेतकऱ्याची माहिती टाकायची आहे. यात शेतकऱ्याचं पूर्ण नाव, रिलेशनशिपमध्ये अर्जदार कुणाचा मुलगा, मुलगी, पत्नी आहे ते निवडायचं आहे. मग पती किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे.

मोबाईल नंबर टाकून verify वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक captcha कोड दाखवला जाईल. तो टाकून Get OTP क्लिक करायचं आहे.

मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून Submit वर क्लिक करायचं आहे.

Pik Vima Yojana Maharashtra पिक विमा योजना महाराष्ट्र 2023 ?

Pik Vima Yojana Maharashtra पिक विमा योजना महाराष्ट्र 2023 ?

Pik Vima Yojana Maharashtra पिक विमा योजना महाराष्ट्र 2023 ?

Pik Vima Yojana Maharashtra पिक विमा योजना महाराष्ट्र 2023 ?

Leave a Comment

error: Content is protected !!