'

Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana भारत सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत किती रक्कम गुंतवली आहे?

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत, कि सरकारने कोणती नवीन योजना आणली आहे, व ती योजना शेतकऱ्यांसाठी किती उपायोगी ठरेल, तर या योजनेचा नक्की काय फायदा होणार व या योजनेसाठी काय अनुदान असणार आहे. किंवा ह्या योजनेला तुम्ही कसा फॉर्म भरू शकता हे आपण पाहणार आहोत. 

Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana

तर पिकांच्या झाडाच्या मुळाशी पाणी हे लहानशा नळीद्वारे म्हणजे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक एक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन होय. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, तो वेग त्यापेक्षा कमी वेगाने पाणी ठिबक सिंचन द्वारे म्हणजेच पिकास पाणी दिले जाते.

हे सुद्धा वाचा – Magel Tyala Saur Krushi Pump Yojana सुरू झाले आहे लवकर अर्ज करा.

या मध्ये मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र सगळ्या देशात अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जातात.

Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana
Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana

तुषार सिंचन म्हणजे ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून ओळखले जाते. हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लॉन्स, भूदृश्य, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरली जातात.

या मध्ये ते थंड हवामान करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापरली जाते.

तुषार सिंचन ही पावसासारख्याच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा एक प्रकार मार्ग आहे. यात पाणी एका नेटवर्कद्वारे वितरीत केले जाते म्हणजेच ज्यामध्ये पंप, वॉल्व्ह , पाईप्स आणि स्पिंकलर्स असू शकतात.

या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते, तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.

Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana

यासाठी अनुदान किती मिळणार आहे.

तर यामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सादर केलेले योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती अनुदान दिले आहे, ही खालील प्रमाणे असेल.

1) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी वर्गसाठी – ५५ % अनुदान असेल
2) इतर शेतकरी वर्गसाठी – ४५ % अनुदान असेल

या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत.

  • शेतकऱ्याकडे त्याचे स्वतःचे आधार कार्ड असने आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे जमिनीचा ७/१२ प्रमाणपत्र किंवा 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी कॅस्टमध्ये असेल तर जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • जर लाभार्थ्याने ह्या आधी या योजनेचा म्हणजे २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असेल तर त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
  • शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच असणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागणार आहे .

हे सुद्धा वाचा – रेशन धारकांसाठी मोठी बातमी मोफत तांदूळ बंद होणार.

  • सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
  • शेतकऱ्यांना फक्त ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे.
  • शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या सिंचनाच्या पावत्या अपलोड कराव्यात.

Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत.

  1. ७/१२ व ८-अ उतरा
  2. ८-ए
  3. वीज बिल
  4. खरेदी केलेल्या सिंचनाचे बिल
  5. पूर्वसंमती पत्र

अधिक माहितीसाठी तुम्ही ही PDF वाचू शकता – येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Note- Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana

कृपया ही माहिती वाचण्याच्या अगोदर तुम्ही बाहेरूनही माहिती तपासून बघा.

Leave a Comment

error: Content is protected !!