Savitribai Phule Scholarship 2023
त्यामुळे शिकण्याची इच्छा असूनही, घरातील बिकट परिस्थितीमुळे बहुतेक तरुण/तरुणींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते आणि त्यामुळे त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होत नाही.
आजही समाजात मुलींना मुलांपेक्षा कमी महत्त्व दिले जात असल्यामुळे आणि आताही स्त्री भ्रूणहत्या होत असून त्यांच्या शिक्षणालाही फारसे महत्त्व दिले जात नाही व मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.
यामध्ये काही वेळा असे दिसून येते कि काही कुटुंबे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी व्याजदराने कर्ज घेतात आणि कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.
या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या योजनेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना असेही म्हणतात.
मागासवर्गीय समाजातील मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कधी करण्याच्या हेतूने इ.५ वी ते इ.७ वीतील मुलींसाठी १९९५-९६ पासून शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर इ.८ वी ते इ. १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ सालापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत इ.८ वी ते इ. १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने रुपये १०० /- प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते.या शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील दलित विद्यार्थीनीला दरमहा रु.१०० /- मिळणार आहेत. ज्या घरात मुलगी म्हणजे ओझे समजले जाते अशा घरात तिला आता न्याय मिळू शकेल. मुलींचे सक्षमीकरण कारणे हा या योजनेमागचा हेतू आहे.
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2023 Highlights
स्योकॉलरशिप योजना | सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप |
---|---|
व्दारा सुरु | महाराष्ट्र शासन |
राज्य | महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाईट | https://bcud.unipune.ac.in/S |
लाभार्थी | राज्यातील गरीब परिवारातील विद्यार्थी |
विभाग | Savitribai Phule Pune University, |
उद्देश्य | गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करणे |
स्कॉलरशिप | 16,000/- रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
श्रेणी | शिष्यवृत्ती योजना |
वर्ष | 2023 |
शिष्यवृत्तीसाठी अटी –
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित,विनानुदानित, माध्यमिक शाळेतील इ.८ वी ते इ. १० वी च्या मुलींसाठी असून ती गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहील.
यासाठी मागासवर्गीय मुलींना उत्पन्नाची अट राहणार नाही. परंतु शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. उपस्थितीनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी मुलींना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
योजनेचा उद्देश –
शासन निर्णय दिनांक १२ जानेवारी, १९९६ अन्वये मागास समाजातील विद्यार्थिनींसाठी व शासन निर्णय दिनांक २९ ऑक्टोबर, १९९६ पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यात आली आहे. सदर प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव –
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे उद्दिष्ट
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा उद्देश
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने अंतर्गत, या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील गरीब मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे.
- या शिष्यवृत्तीद्वारे देऊ केलेल्या दीर्घकालीन आर्थिक सहाय्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्याचा पाया घालण्यात मदत करणे हा आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश समाजातील ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण घेणे परवडत नाही त्यांना शिष्यवृत्तीची संधी उपलब्ध करून देणे हा आहे जेणेकरून ते त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील.
- राज्यातील विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विकास करणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे.
- राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वावलंबी बनवणे.
- या योजनेच्या मदतीने राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावेल आणि सुधारेल.
Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ?
नियम, अटी व पात्रता इ. :
- उत्पन्न व गुणाची अट नाही.
- संबंधित शाळेच्या मुख्याणद्यापकांनी विद्यार्थ्यांबचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्येक.
- ७५% उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावा.
- लाभधारक मुलगी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी.
- सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील खात्यामध्ये/ ऑनलाईन जमा करण्याषत येते.
अर्ज करण्याची पध्दत
सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावेत.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2023 फायदे
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती काही लाभ खालीलप्रमाणे आहेत
- सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या मदतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतू गुणवंत विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतात आणि जीवनात ते स्वतःची व त्यांच्या कुटुंबाची प्रगती करू शकतात
- विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि शिक्षणासाठी कोणाकडूनही जास्त व्याजावर कर्ज घेण्याची गरज नाही.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थी सक्षम आणि स्वावलंबी होतील.
- राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल आणि तसेच शिक्षणा संबंधित पुढील मार्ग सुविधापूर्ण होतील
- या योजनेच्या मदतीने विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून भविष्यात स्वत:साठी चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा शिक्षणाच्या मदतीने स्वत:चा उद्योग सुरू करून राज्यातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकतील या माध्यमातून राज्यातील बेरोजगारी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
- या योजनेच्या मदतीने विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करून स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील
- विद्यार्थ्यांचे मागील लगतचे अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत
- तहसीलदाराने दिलेला वार्षिक उत्पन्न दाखला
- जातीचा दाखला
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- रहिवासी पुरावा
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- मार्कलिस्ट
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- दुष्काळग्रस्त/पूरग्रस्त/आपत्तीग्रस्त/विभाग प्रमुख किंवा प्राचार्यांचे शिफारस प्रमाणपत्र
FAQ
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप काय आहे?
महाराष्ट्रातील गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे त्याचबरोबर त्यांची गुणवत्ता वाढवणे आणि त्यांना सर्वसामान्यांच्या शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहण्यास सक्षम करणे
योजनेचे फायदे काय आहेत?
शिक्षण पूर्ण करण्यासाठी रु. 6000/- ते रु. 16,000/- पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय गरीब कुटुंबातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी आहेत.
योजना कोणत्या राज्यात लागू आहे?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना केवळ महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
Savitribai Phule Scholarship 2023 सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2023 ?
Savitribai Phule Scholarship 2023 सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2023 ?
Savitribai Phule Scholarship 2023 सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2023 ?
Savitribai Phule Scholarship 2023 सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2023 ?
Savitribai Phule Scholarship 2023 सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2023 ?
Savitribai Phule Scholarship 2023 सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2023 ?
Savitribai Phule Scholarship 2023 सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2023 ?