Sheli Palan Yojana Mahaashtra 2023
शेळी पालन योजना काय आहे २०२३
नमस्कार मी २४ तास मराठी या न्युज चॅनेलचा संपादक, आपण आज आपल्या लेखात पाहणार आहोत कि, नक्की शेळी पालन योजना काय आहे.
या बद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या लेखात पाहणार आहोत, या योजनेमध्ये काय फायदा शेतकऱ्यांना होणार, हि योजना कशी मिळवायची या बद्दल माहिती आपण पाहुयात.
शेळी पालन योजना काय आहे –
महाराष्ट्र सरकार या योजनेंतर्गत लोकांना कर्ज उपलब्ध करून देते आणि सबसिडी देखील देते. ज्यांना शेळीपालनाचे ज्ञान आहे त्यांना शेळी पालन योजना 2022 अंतर्गत प्राधान्य दिले जाते या साठी कमीत कमी तुमच्याकडे एवढी जमीन असली पाहिजे की ज्यामध्ये तुम्ही 100 शेळ्यांसह 5 बोकड सहज ठेवू शकता.
शेळीपालनासाठी किती अनुदान मिळते-
भारतात शेळीपालन फायदेशीर आहे का-
भारतात कोणती शेळी जास्त दूध देते-
मी माझ्या शेळी फार्मची नोंदणी कशी करू-
100 शेळ्यांसाठी किती क्षेत्र आवश्यक आहे-
शेळ्यांच्या निवासासाठी विचारात घेण्यासारख्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक म्हणजे जनावरांसाठी आवश्यक असलेली जागा. 100 शेळ्या असलेल्या व्यावसायिक शेळी फार्म सेटिंगमध्ये, 20 mx 10 मीटर आकाराचे आच्छादन स्टॉल-पावलेल्या शेळ्यांसाठी पॅडॉक म्हणून पुरेसे मानले जाते.
शेळ्या-मेंढ्या गट वाटप योजनेचे स्वरूप –
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी /संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील, अशा प्रजातीच्या पैदास व एक बोकड अथवा मडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खनी व अन्य स्थानिक प्रजातींच्या दहा मेंढ्या व एक नर मेंढा असा गट वाटप करण्यात येईल.
शेळी मेंढी गट वाटप योजनेचे स्वरूप आणि अटी व शर्ती कोणत्या?
- या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी किंवा संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या आणि एक बोकड अथवा मडग्याळ प्रजातीच्या किंवा दखनी व अन्य प्रजाती अन्य स्थानिक प्रजातीच्या दहा मेंढ्या आणि एक नर मेंढा असा गट हा वाटप करण्यात येणार आहे. शेळी किंवा मेंढ्यांच्या प्रजातीची निवड करण्याचे स्वातंत्र्य हे लाभार्थ्यांना असणार आहे.
- सदर योजनेमध्ये खुल्या व इमाव प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ५० टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहील व ५० टक्के हिश्श्याची रक्कम लाभार्थ्यांनी स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन (किमान ५ टक्के स्वतःचा हिस्सा व उर्वरित ४५ टक्के बँकेचे कर्ज) असे उभारणे आवश्यक आहे.
- तसेच सदर योजनेमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहील व २५ टक्के हिश्श्याची रक्कम लाभार्थ्याने स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन (किमान ५ टक्के स्वहिस्सा व उर्वरित २० टक्के बँकेचे कर्ज उभारणे आवश्यक असणार आहे.
- शेळी/मेंढी गटाच्या खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च हा लाभार्थ्याने स्वखर्चाने करणे हे आवश्यक राहील.
Sheli Palan Yojana | शेळी मेंढी गट वाटप योजनेमध्ये लाभार्थी निवडीचे निकष व प्राधान्य कसे आहे ?
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्पभूधारक (एक हेक्टर पर्यंतचे भूधारक लाभार्थी)
- अल्पभूधारक ( १ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
- सुशिक्षित बेरोजगार रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेला बेरोजगार युवक
- महिला बचत गटातील लाभार्थी (अ क्र. अ ते ड मधील)
सदर योजनेअंतर्गत १० शेळ्या व एक बोकड शेळी गटांचा व दहा मेंढ्या व एक नर मेंढा या गटांचा खर्चाचा तपशील हा खालील प्रमाणे असणार आहे.
Sheli Palan Yojana Maharashtra शेळी पालन योजना काय आहे २०२३?
Sheli Palan Yojana Maharashtra शेळी पालन योजना काय आहे २०२३?