'

Majhi Bhagyashree Kanya Yojana माझी कन्या भाग्यश्री योजना 2023

24taasmarathi
6 Min Read

Majhi Bhagyashree Kanya Yojana

राज्यात १३ फेब्रुवारी २०१४ रोजी सुकन्या योजना सुरू करण्यात आली. सुकन्या योजनेचा लाभ दिनांक १ जानेवारी २० पासून जन्मणाऱ्या मुलींकरता अनुज्ञेय राहणार आहे. केंद्र शासनाने बेटी बचाव बेटी पढाव योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू केलेली आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी भारतातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे. त्या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे.

या केंद्रपुरस्कृत योजनेमध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद व जालना यांची निवड करण्यात आलेली आहे.

मुलींचा जन्मदर १,००० मुलांच्या मागे ८९४ इतका आहे. मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे आणि मुलांनी एकाच मुलींचाही जन्मदर वाढविणे या उद्दिष्टाने बेटी बचाव बेटी बेटी पढाव या योजनेच्या धर्तीवर मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, अशा सुरू असलेली सुकन्या योजना विलीन करून माझी कन्या भाग्यश्री ही एक नवीन योजना राबविण्यात येत आहे.

माझी भाग्यश्री कन्या योजना 2023

maji kanya bhagyashtree yojana benefits

maji kanya bhagyashtree yojana benefits

माझी कन्या भाग्यश्री योजना शासन निर्णय –

राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, त्यांना शिक्षण देणे, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्दिष्टांसाठी शासन निर्णयान्वये सुकन्या योजना दिनांक १ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे रुपये २१,२००/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये १ लाख एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल. अशी तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे.

माझी कन्या भाग्यश्री या नवीन योजनेमध्ये सध्या सुरू असलेली सुकन्या योजना की विलीन करण्यात आलेली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेचे कायम ठेवून त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षे वयाची होईपर्यंत खालील तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे लाभ देण्यासाठी तसेच दारिद्र रेषेखालील एपीएल रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला येणार्‍या प्रत्येक मुलीसाठी तक्ता क्रमांक दोन मधील एक लाभ देण्यात येणार आहेत.

१.मुलीच्या जन्माच्या वेळी

सध्याच्या परंपरेनुसार कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा केला जातो.

या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमुळे मुलीचा जन्मोत्सव साजरा करण्यास प्रेरित होतील. जनमानसाच्या मानसिकतेत बदल होईल.

२. मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी –

कुटुंबामध्ये मर्यादित उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध असल्यामुळे, त्या स्रोतांचा उपयोग मुलांच्या पालन पोषणासाठी केला जातो.

काही वेळा मुलींकडे याबाबतीत दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आर्थिक मदत दिल्यामुळे मुलींच्या पालन पोषणासाठी त्यांच्या आरोग्य दर्जा उंचावणे तसेच त्या मुलीस करावयाचे लसीकरण व इतर खर्चासाठी कुटुंबास मदत होईल.

३. मुलगी इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता ६ वी ते १२ वीत आर्थिक मदत –

या आर्थिक मदतीचे उद्दिष्ट्य मुलींचे शिक्षण पूर्ण करावे, जेणेकरून पुढील मातांची पिढी सुशिक्षित होईल. त्यामुळे त्यांची मुले ही आरोग्यसंपन्न असतील. तसेच त्या शिक्षित मुली मुलामुलींमध्ये भेदभाव करणार नाहीत.

४. वयाच्या १८व्या वर्षीची आर्थिक मदत –

या आर्थिक मदतीचा उद्दिष्ट हे मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्याचे आहे. या शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण माता या आरोग्यसंपन्न मुलास जन्म देतील. त्यांच्या मुलांनादेखील शिक्षित करतील आणि मुला-मुलींना सामान ठेवतील.

५. मुलीचा जन्म झाल्यानंतर आजी-आजोबांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार –

समाजातील बऱ्याच कुटुंबातील सासू-सासरे यांच्याकडून मुलगाच पाहिजे, असा दबाव सुनेवर टाकला जातो.

त्यासाठी जन्म देणाऱ्या मातेच्या सासु-सासर्‍यांना एक सोन्याचे नाणे (रुपये ५,००० मर्यादेपर्यंत) आणि प्रमाणपत्र देऊन माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन किंवा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन किंवा राष्ट्रीय बालिका दिन किंवा महिला दिन अशा प्रसंगी सत्कार करण्यात येईल. यामुळे कुटुंबाचा समाजात आदर वाढेल.

६. गावाचा गौरव –

या योजनेअंतर्गत समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी ज्या गावांमध्ये मुला मुलीचे लिंग गुणोत्तर एक हजार पेक्षा जास्त असेल, अशा गावास माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्यामार्फत रुपये ५ लाखाचे पारितोषिक दिले जाईल.

संबंधित मिळालेली रक्कम ग्रामपंचायतीने गावातील मुलींच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक राहील.

Key Highlights Of Majhi Kanya Bhagyashri Yojana 2023

योजनेचे नाव – माझी कन्या भाग्यश्री योजना
महाराष्ट्र शासनाने सुरू केले
लाँच तारीख 1 एप्रिल 2016
लाभार्थी राज्याची मुलगी
महाराष्ट्रातील मुलींचे जीवनमान उंचावणे हा उद्देश

Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ

 • या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोन मुलींना मिळणार आहे.
 • माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 अंतर्गत, लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावे राष्ट्रीय बँकेत संयुक्त खाते उघडले जाईल.
 • आणि या अंतर्गत दोघांना 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट देखील मिळेल.
 • या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन (नसबंदी) केले जाते. त्यामुळे 50 हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे.
 • 2 मुलींच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन केल्यास. त्यामुळे सरकारकडून दोघांना 25-25 हजार रुपये दिले जातील.
 • माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 अंतर्गत, राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
 • महाराष्ट्रातील अधिकाधिक कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतील, म्हणून सरकारने कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये केली आहे.
 • या योजनेनुसार, मुलीच्या जन्माच्या 1 वर्षाच्या आत किंवा दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या 6 महिन्यांच्या आत मुलींच्या आई किंवा वडिलांना नसबंदी करणे बंधनकारक असेल.

माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 ची कागदपत्रे आणि पात्रता –

 1. अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 2. जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चा लाभ मिळू शकतो.
 3. जर तिसरे अपत्य जन्माला आले तर दोन्ही मुलींना या योजनेचा प्रथमच लाभ दिला जाणार नाही.
 4. अर्जदाराचे आधार कार्ड
 5. पालक किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
 6. पत्त्याचा पुरावा
 7. उत्पन्न प्रमाणपत्र
 8. मोबाईल नंबर
 9. पासपोर्ट आकाराचा फोटो

Majhi Bhagyashree Kanya Yojana माझी कन्या भाग्यश्री योजना 2023

Majhi Bhagyashree Kanya Yojana माझी कन्या भाग्यश्री योजना 2023

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!