'

what is IPO meaning in marathi || IPO म्हणजे काय || जाणून घ्या IPO बद्दल महत्वाच्या गोष्टी.

24taasmarathi
7 Min Read

what is IPO meaning in marathi

आपण नेहमी ऐकतो किंवा पेपर मध्ये वाचतो ह्या कंपनी चा IPO आला, त्या कंपनीचा आयपीओ आला, त्या एका कंपनीच्या आयपीओ oversubscribe झाला, वगैरे वगैरे . तर चला जाणून घेऊया आयपीओ म्हणजे नेमकं असतंय तरी काय(what is IPO meaning in marathi).

IPO म्हणजे काय ?(what is IPO meaning in marathi)

Initial public offer( प्राथमिक समभाग विक्री). जेव्हा कोणतीही कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पहिल्यांदा शेअर बाजारामध्ये येथे आणि पैसा उभारते त्याला आयपीओ म्हणतात. याद्वारे कोणीही त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतो.

एक उदाहरणद्वारे समजून घेऊया. समजा एक व्यक्ती आहे श्यामभाऊ. श्यामभाऊ ने त्यांच्याजवळ असलेल्या बचतीमधून एक दुकान उघडायचे ठरवले दुकान चांगले चालायला लागले. तेव्हा श्यामभाऊच्या डोक्यात विचार आले की अजून अनेक ठिकाणी शाखा उघडल्या तर? पण यासाठी पैसा कसा उभा करायचा त्यासाठी ते त्यांच्या मित्रा जवळ गेले आणि दोघांनी 50 -50 टक्के भागीदारी अनेक ठिकाणी दुकाने उघडली ही दुकाने चांगले चालू लागली.

हा व्यवसाय वाढवण्याच्या बाबतीत त्यांच्या डोक्यात विचार आला की पूर्ण राज्यभर ह्याचा शाखा सुरु केल्यातर ?मग त्यांनी त्यासाठी आणि गुंतवणार शोधले आणि त्याच्या काही दुकानाचं भागीदारी पैशांच्या बदल्यात लोकांना दिले, त्यामुळे ते गुंतवणूकदारी दुकानाचे मालक झाले याला सोप्प्या शब्दात म्हणायचं इनिशियल पब्लिक ऑफर.

IPO आणण्याची प्रोसेस काय असते?

जेव्हा कंपनीला आपला आयपीओ आणायचा असल्यास कंपनीला सेबीकडे जावे लागते. कंपनी सेबीसाठी एक माहिती पुस्तिका तयार करते त्याला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (Draft Red Herring Prospectus (DRHP)) म्हणतात. यामध्ये कंपनीची सर्व माहिती जसे की कंपनी काय करते? कंपनीचा व्यवसाय कोणत्या क्षेत्रांमध्ये आहे,? कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत?, कंपनीला पैशाची गरज का आहे? अशी माहिती असते. त्याचबरोबर कंपनीचे प्रमोटर्सचे शिक्षण कुठे झाले आहे,? कोणती डिग्री आहे? कोणता गुन्हा आहे का? अशी सगळी कंपनीची व प्रमोटर ची कुंडलीच असते.

या माहितीमध्ये जर सेबी समाधानी असेल तर DRHPला मंजुरी देते आणि ते आणि ते होते RHP(Red Herring Prospectus). सेबीच्या मंजूर नंतर कंपनीला एक वर्षांमध्ये बंधनकारक असते(what is IPO meaning in marathi).

Initial public offering

IPO ची किंमत म्हणजे काय ?

यानंतर आयपीओ ची किंमत ठरवली जाते आणि त्या किंमतीला कंपनीद्वारे आयपीओ आणला जातो. सेबीच्या मंजूर अंतर कंपनी आयपीओ येण्याची तारीख निश्चित करते. साधारणपणे तीन ते चार दिवस आयपीओ ओपन असतो, त्या दिवसांमध्ये गुंतवणद्वार आयपीओ साठी बोली लावतात.

1.निश्चित किंमत ऑफर::

आयपीओ ची एक फिक्स प्राईस असते.

2.बुक बिल्डिंग ऑफर::

एक किंमत पट्टा (Price band )ठेवला जातो, आणि हा प्राइस बॅड कंपनी ठरवते आणि गुंतवणूकदार त्यावर बोली लावतात. उदाहरणार्थ प्रत्येक शेअरसाठी 100 ते 120 रुपये. सेबीच्या नियमानुसार हा प्राइस बँड मधील फरक हा 20 टक्के पेक्षा जास्त नसावा.

what is IPO meaning in marathi

IPO Apply करायची प्रोसेस?

1.जर आपल्याकडे ऑनलाईन बँकिंग ची सुविधा असेलतर त्याद्वारे सुद्धा आपण आयपीओ ला apply करू शकतो

2.IPO अप्लाय करायची सुविधा शेअर ब्रोकर जसे zerodha ,groww , upstox  यांच्याकडे असते.

यामध्ये आपल्याला किती लॉट पाहिजे ती माहिती त्याचबरोबर आपला बँक अकाउंट नंबर किंवा युपी आयडी आणि आपली किंमत अशी बोली लावावी लागते.

Animal Box Office Collection ऍनिमल या चित्रपटाचा किती इनकम झाला ते बघूया

IPO मध्ये पैसा का लावला जातो?

गुंतवणूकदार म्हणून आपण कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये लिस्ट झाल्यावर सुद्धा पैसे लावू शकतो मग आयपीओ मध्येच का पैसा लावला जातो? तर याला कारण असे आहे ही कंपनी लिस्ट झाल्यावर आयपीओ किंमतीपेक्षा जास्त किंमतीवर लिस्ट होऊन चांगला परतावा देईन ही अपेक्षा असते. पण काही वेळेस हा जुगार सुद्धा होऊ शकतो आणि आयपीओ किंमतीच्या तुलनेत शेअर लिस्ट झाल्यावर शेअरची किंमत आपटते आणि गुंतवणूकदाराचे नुकसान होते(what is IPO meaning in marathi).

IPO Apply केल्यानंतर ची पुढची प्रोसेस काय?

आयपीओ ला apply केला म्हणजे शेयर्स मिळतातच असे नाही कारण कंपनी कडे १०० शेयर्स असतील आणि ११० लोकांनी बोली लावली तर ह्या परिस्थितीत सगळ्यांना शेयर्स अलॉट होतात असंही नाही किंवा जास्त पैशाला बोली लावली म्हणजे मिळतात असाही नाही, जास्त मागणी असेलतर लॉटरी पद्धती द्वारे शेयर्स अलॉट केले जातात. सामान्यपणे दोन ते तीन आठवड्यानंतर मार्केटमध्ये लिस्ट होतात. हे शेअर्स लिस्ट होण्याअगोदर ज्यांना अलॉट झालेत त्यांचा डिमॅट अकॉउंट मध्ये जमा होतात.

 

आयपीओ शेअर कधी विकू शकतो?

शेअर्स मिळण्यानंतर कधी विकायचे किंवा किती दिवस ठेवायचे काहीही बंधन गुंतवणूकदारावर नसते. लिस्ट झाल्याच्या दिवशी सुद्धा विकू शकतो किंवा वर्षानुवर्ष तसाच ठेवू शकतो(what is IPO meaning in marathi).

 

IPO VS FPO

साधारणपणे IPO मध्ये नवीन शहर इश्यू केले जातात. तर शेअर धारक आपले शेअर विकतात त्यामध्ये कंपनी प्रमोटर्स, किंवा ज्यांच्याकडे कंपनीचे १० % शेअर्स आहेत ते आपले शेअर विक्रीस काढतात त्याला ऑफर फॉर सेल असे म्हणतात.जेव्हा कंपनी पहिल्यांदा शेयर इशू करते त्याला आयपीओ म्हणतात तर आयपीओ नंतरही ही कंपनीला पैशाची गरज भासल्यास कंपनी काही वर्षांनंतर परत पब्लिक ऑफर आणते त्याला फॉलोऑन पब्लिक(FPO) ऑफर म्हणतात.

IPO लिस्ट झाल्यानंतर पुढे काय?

शेअर लिस्ट झाल्यावर कंपनीचा एक शेअर घेऊनही गुंतवणूकदार कंपनीचा भागीदार होऊ शकतो. पण सेबीचा एक नियम कंपनीसाठी असा आहे की कमीत कमी 25 टक्के शेअर्स मार्केटमध्ये उपलब्ध असेल हवेत(what is IPO meaning in marathi).

 

IPO मध्ये किती पैसे लावू शकतो?

सामान्य गुंतवून गुंतवणूकदार आयपीओ मध्ये दोन लाखापर्यंत पैसे लावू शकतो. २ लाख रुपयांपर्यंत र्यंत पैसे लावणाऱ्यांना रिटेल इन्वेस्टर म्हणतात तर दोन लाखापेक्षा जास्त पैसा लावणार यांना High net worth Invester (HNI).Institutional investors किंवा Qualified Institutional Investors (QIIs) म्हणजे अशी कंपनी किंवा स्वंस्था जी आपल्या ग्राहकांसाठी पैसे गुंतवते जसे कि mutual fund कंपनी.Institutional investors IPO मध्ये सामान्यपणे रिटेलर साठी 35 ते 40% कोटा रिझर्व्ह असतो तर HNI १० ते १५ % कोटा असतो आणि QIIs साठी 50 ते 60 टक्के कोटा रिझर्व असतो(what is IPO meaning in marathi).

#what is IPO meaning in marathi

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!